आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
मुंबई, दि. 26, सप्टेंबर - बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली आहे. हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांनी आठव्या स्थानावर झेप घेतली असून त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपये असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या आचार्य बालकृष्णांनी टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. 2 लाख 57 हजार 900 कोटी रुपयांची संपत्ती अंबानींकडे आहे. दुसर्या क्रमांकावर असलेल्या दिलीप संघवींकडे त्यांच्यापेक्षा निम्म्याहून कमी संपत्ती आहे.
डी-मार्ट स्टोअर्सचे दमानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे 320 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचे एमडी अनुराग जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 286 टक्क्यांनी वाढली आहे. संपत्तीत झालेल्या वाढीच्या क्रमवारीनुसार जैन यांचा दमानींपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो. ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख असलेले 45 वर्षीय आचार्य बालकृष्ण हरिद्वारमध्ये राहतात. पतंजलीची 2016-17 या आर्थिक वर्षाची उलाढाल 10 हजार 561 कोटी रुपयांची आहे. हरुन इंडियातील रिपोर्टनुसार पतंजली आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना तगडी टक्कर देत आहे. नोटाबंदी, जीएसटी यासारख्या सरकारी निर्णयांमुळे श्रीमंतांच्या संपत्तीत भरभराट झाल्याचं हरुन इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.

Post Comment