समृद्धी महामार्ग दराबाबत 30 नोव्हेंबर रोजी बैठक
औरंगाबाद, दि. 26, नोव्हेंबर - जिल्ह्यातील रस्ते कामांना सर्वच विभागांनी एकत्र येऊन गती द्यावी, तसेच टिकाऊ व उत्तम दर्जाचे तयार करून नागरिकांना सेवा देण्याची सूचना शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या 8 विभागाच्या बैठकीत अधिका-यांना निर्देश दिले.
तसेच समृद्धी महामार्ग दराबाबत झालेल्या तफावतीबाबत 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेतक-यांसह अधिका-यांची बैठक घेऊन शेतक-यांचे मत जाणून घेणार आहे. कामात कुठलाही श्रेयवाद न करता जे नागरिक कर भरतात त्यांना उत्तम सुविधा देणे कर्तव्य समजले पाहिजे, असे ते म्हणाले.
सध्या स्थितीत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेऊन निविदा प्रक्रिया व कार्यादेश झालेल्या कामांना त्वरित सुरु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ग्रामीण भागातील रस्तेकामांना पॅचवर्क व डागडुजी न करता नव्याने अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग बाबत काम सुरु असून याबाबत लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून ए. एस क्लब रस्तांबाबत वाढीव निधी मागून डिव्हायडर बसल्यास अपघात कमी होईल.