Breaking News

व्यवस्थेतील कृषी पुञांचा मातृ पितृ द्रोह

दि. 28, ऑक्टोबर - स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेती मालाला उत्पादन आधारीत खर्चावर हमी भाव अशा काही प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि शेतक री वर्गाची पिढीजात कुचंबणा थांबवावी यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाला आहे.आजवर कधी नव्हे ती आक्रमकता या कृषक वर्गात पहायला मिळत असून  स्वातंञ्यानंतरच्या प्रत्येक सरकारने अन्नदाता म्हणून राबणार्या या घटकाच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना या आक्रमकतेला कारणीभूत ठरली आहे.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर राज्यात पहिल्या दिवसापासून सत्तेवर असलेल्या गटात बहुसंख्येने कृषी पुञांचा भरणा होता आणि आहे.तरीही जन्मदात्या बापाच्या दुःखावर फुंकर  मारण्याऐवजी भावनांशी प्रतारणा करण्यातच या मंडळींनी हशील मानल्याने शेतकर्यांची अवस्था दयनीय बनली आहे.
हा सारा असंतोष आता ओसंडून वाहू लागला असून शेतकर्यांनी किसान क्रांतीचा एल्गार पुकारला आहे.
एप्रील मे मध्ये अगदी सहजपणे अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा नावाचे गाव सःप करण्याची भुमिका माःडते. ग्रामपंचायत ठराव होतो. हे लोण वादळासारखे महाराष्ट्रभर पसरते आणि  जुन महिन्याचा पहिला आठवडा शेतकर्यांच्या संपाने जगभर गाजतो.या संपाचे लोण देशभर पसरते. पंजाब मध्यप्रदेश राजस्थान मधील शेतकर्यांचा महाराष्ट्राला पाठींबा मिळतो.  पुणतांब्याने पेटवलेली संपाची पणती देशभर वणवा पेटविण्यास निमित्त ठरते.सर्व विचारधारेच्या शेतकरी संघटना अन्नदात्याच्या झोळीत न्यायाचं माप टाकण्यासाठी एकञ आल्या. सुक ाणू समितीच्या माध्यमांतून आजपर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने हा लढा सुरू आहे.
एव्हढ्या संघटीतपणे हा लढा सुरू ठेवूनही राजसत्ता बधत नाही .यामागची कारणे भयानक आहेत.सत्तेत बसलेले सत्ताधारी, सत्ताधार्यांची चापलूसी करणारे विरोधक आणि प्रशासनाच्या  झारीतील शुक्राचार्य यांत सहभागी असलेले कृषी पुञच खर्या अर्थाने या प्रश्‍नाला न्याय देण्यात अडसर निर्माण करीत आहे, जमीनीत राञं दिवस रक्ताचा घाम गाळून या दिवट्यांना  मोठे केले त्याचे पांग अशा पध्दतीने फेडण्याचा प्रमाद या दिवट्यांच्या हातून घडत आहे. आणि म्हणूनच पुणतांब्या पाठोपाठ आता कानगावच्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा  अन्नदात्याला संपाची आर्त हाक देण्याची वेळ आली आहे, या परिस्थितीला व्यवस्थेत बसलेल्या डोमकावळे कृषी पुञांचा मातृ पितृ द्रोहच कारणीभूत आहे, हे सांगण्यासाठी कुण्या  भंपक तज्ञांची गरज नाही.