Breaking News

नांदेड पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार करणे शक्य

नांदेड, दि. 28, ऑक्टोबर - नांदेडच्या नागरिकांना आता पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या ऑनलाईन तक्रार करणे सहज शक्य झाले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानि रिक्षक चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 
मागील सहा महिन्यापासून सीसीटीएनएस ही प्रणाली अवलंबण्यात येत असून या कालावधीत वाहन चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत़ सीसीटीएनएस ही प्रणाली राबविण्यात  नांदेड परीक्षेत्र राज्यात पहिल्या क्रमांकाचे ठरले या प्रणालीमुळे ऑनलाईन तक्रार देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.