व्यायाम शाळेच्या नावावर अनुदान घेवून संस्था अध्यक्षांनी बांधले घर!
बुलडाणा, दि. 24 - लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील जयभोले बहु.क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर पांडुरंग दहातोंडे यांनी व्यायाम शाळेच्या नावावर 2010-11, 2011-12, 2012-13 ला लाखो रुपयांचे अनुदान घेवून घर बांधले. त्यामुळे गावातील तरुणांना व्यायाम करण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. यामुळे क्रीडा धोरणाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत 1 मे 2017 रोजी परशराम सखाराम दहातोंडे, संजय वासुदेव दहातोंडे, विनायक महादेव दहातोंडे रा. कोयाळी यांनी सदर संस्थेने शासनाचा गैरवापर केल्याची व व्यायाम शाळेच्या नावावर चक्क घर बांधले असल्याची तक्रार जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
सदर प्रकार हा गंभीर असून शासनाच्या अनुदानावर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवासह सदस्यांनी डल्ला मारला असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे गावातील युवक क्रीडा साहित्याचा वापर करुन व्यायाम करण्यापासून वंचित राहिले आहे. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा यांनी रामेश्वर पांडुरंग दहातोंडे यांना शासनाकडून घेतलेले अनुदान व्याजासह परत का करण्यात येऊ नये अशी नोटीस पाठविली आहे.