तेजस एक्सप्रेसमध्ये आता स्वस्त दरातील हेडफोन

मुंबई, दि. 29 - मुंबई गोवा दरम्यान सुरू झालेल्या प्रिमियर तेजस एक्सप्रेसमधील हेडफोन लंपास प्रकरणानंतर आता स्वस्त दरातील हेडफोन देण्याचा निर्णय रेल्वे  प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 
तेजसच्या पाचव्या फेरीदरम्यान भारतीय खानपान आणि पर्यटन मंडळाकडून 30 रुपये किंमतीचे हेडफोन देण्यात आले. चोरीस गेलेल्या हेडफोनची नक्की आकडेवारी  मंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितली नसली तरी 30 रुपयांचे हजार हेडफोन खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन व्हावे,  यासाठी विमानात दिल्या जाणार्‍या सुविधांच्या आधारावर सुविधा पुरवल्या जात आहेत. दरम्यान, तेजसच्या पहिल्याच फेरीत हेडफोन चोरीस जाणे आणि एलईडीच्या  तोडफोडीचे गैरप्रकार उघडकीस आले होते.