सोलापुरातील जंगलात लांडग्यांची संख्या घटली
सोलापूर - नान्नज माळढोक अभयारण्य परिसरासोबत सिद्धेश्वर वनविहार, कोंडी, हिरज यासह विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. नान्नज अभयारण्य प रिसरात एक मादी माळढोक पक्षी दिसला. रस्त्याच्या कामांमुळे काळविटांचा समूह स्थलांतरित झाल्याने त्यांची संख्या कमी नोंदवली गेली आहे. नान्नज अभयारण्य परिसरातील नान्नज, अकोलेक ाठी, मार्डी, कारंबा, गंगेवाडी, पिंपळा, नरोटेवाडी, वडाळा अशी सात गावांमधील पाणवठ्यांवर वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. एकूण 32 प्रगणकांच्या साह्याने ही गणना करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लांडग्यांची संख्या कमी झाली आहे. याचे कारण लांडग्यांचा समूह फुटून काही लांडग्यांचे स्थलांतर झाले आहे. तसेच काळविटांच्या संख्येतही मोठी घट आढळून आली आहे.