Breaking News

पाण्यात बुडून मायलेकींचा मृत्यू

जालना, दि. 29 - भोकरदन तालुक्यातील जुनी कुा गावात धुणे धुण्यासाठी खदाणीवर गेलेल्या मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जुनी कुंभारी शिवारातील  सरकारी खदाणीत काल दुपारी दोन वाजता खदाणीवर काम करणार्या कलाबाई रामचंद्र पवार (35, रा. भीवगाव) या आरती (9) व भारती (5) या मुलीसह धुणे  धुण्यासाठी खदाणीवर गेल्या होत्या. तेथे धुणे धुवत असताना अचानक आरती पाय घसरून पाण्यात पडली. ती बुडत असल्यचे पाहून तिला वाचविण्यासाठी  कलाबाईंनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्यामुळे दोघींचा पाण्यात बुडू लागल्या. सोबतच्या भारतीने धावत जाऊन पसिरात काम करणार्या मजुरांना  घडलेला प्रकार सांगितला. हे मजूर धावतच खदाणीपर्यंत गेले मात्र ते तेथे पोहोचेपर्यंत कलाबाई आणि आरती यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघींचाही मृतदेह  पाण्याबाहेर काढला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मायलेकींचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने कुंभारी परिसरात  शोककळा पसरली.