अवसरी खुर्दमध्ये गावठाण अंतर्गत रस्त्याची चाळण
अकोले, दि. 29 - अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील गावठाण अंतर्गत बंदिस्त गटार योजना व नळपाणी पुरवठा योजनेचे पाईप रस्त्याच्या मधोमध व कडेने गाडल्याने गावठाण अंतर्गत रस्त्याची चाळण झाली आहे.श्री काळभैरवनाथ पालखीमार्गे जुनी बॅक आफ बडोदा रस्ता व पोस्ट कार्यालय परिसरातील रस्त्याचे पावसाळ्यापुर्वी सिमेंट कॉक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करावे. अन्यथा पावसाळ्यात सदर रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील होणार आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्याचे सिंमेंट कॅाक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करावे अशी मागणी वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
अवसरी खुर्द गावठाण अंतर्गत बंदिस्त गटार योजनेचे पाईप गाडण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे लोखंडी पाईप गाडण्यासाठी मागील वर्षी श्री काळभैरवनाथ मंदीर ते कन्याशाळा व नंदु खेडकर यांच्या शेतातील रस्ता त्याचप्रमाणे खुडेआळी ते पोस्ट कार्यालय पारगाव रस्ता इत्यादी तीनही महत्वाचे व वर्दळीचे रस्ते ठेकेदाराने खोदुन ठेवल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खुडेआळी ते पोस्ट कार्यालय पारगाव रस्त्याने स्थानिक रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातुन वाट शोधावी लागत होती.
पावसाळा संपुन आता एक वर्ष उलटले आहे.थोड्याच दिवसात पुन्हा पावसाळा चालु होईल तरी सुध्दा वर्षभरात गटार योजना, नविन पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन पुर्ण क्षमतेने चालु झाली नाही.तसेच विविध रस्त्यावर वर्षभरात ग्रामपंचायतीने सिमेंट कॅक्रीटीकरण किंवा डांबरीकरण केले नाही. केंद्र राज्य शासनाचा भरपुर निधी ग्रामपंचायतीला मिळत आहे. त्यातच विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्य शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत अवसरी खुर्द हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र सबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांचे आर्थिक हितसंबसंध गुंतल्याने गावामध्ये दर्जेदार कामे होत नसुन एकाच कामाला दोन ते तीन वेळा निधी खर्च होत असल्याचे पहावयास मिळत आहे.