बाळासाहेब खबाले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) : जगदंबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खबाले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. 30 शनिवार, 31  डिसेंबर व रविवार दि. 1 जानेवारी 2017 रोजी जगदंबा डेअरी खबालवाडी, ता. पाटण येथे जगदंबा प्रतिष्ठान तारळे यांच्यावतीने करिअर मार्गदर्शन मेळावा,  महिला सबलीकरण मार्गदर्शन मेळावा, शेतकरी मेळावा, जगदंबा भूषण पुरस्कार वितरण, सत्कार सोहळा व कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. 
तारळे परिसरातील सक्रिय असलेले बाळासाहेब खबाले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता तारळे भागातील  विद्यार्थी-विद्यार्थिंनी व सुशिक्षित बेरोजगारां-साठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील,  उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी श्रीमती सुचिता भिकाने, तहसीलदार रामहरी भोसले, सह्याद्री अ‍ॅकॅडमीचे संचालक नितेश फाळके, प्रा. आकाश  पाटील उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता महिला सबलीकरण मार्गदर्शन मेळावा होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील  यशस्विनी महिला फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राणी पाटील, उंब्रजचे सपोनि घाडगे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, पाटण पंचायत समिती  सदस्या सौ. आरती पन्हाळे, कोंजवडेच्या माजी सरपंच सौ. क्रांती साळुंखे, सौ. सुनंदा शिंदे  उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता 2017 च्या जगदंबा  दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा, यशवंत गौरव पुरस्कार मिळाल्या-बद्दल सत्कार, शेतकरी मेळावा, जगदंबा भूषण पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा आयोजित  केला आहे. यावेळी आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, साताराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे  उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि. 1 जानेवारी 2017 रोजी दुपारी 4 वाजता तारळे-वेखंडवाडी रस्त्याजवळ कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे.  यावेळी युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, भिमरावदादा घोरपडे, विक्रमबाबा पाटणकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन  विनोद खबाले-पाटील, संतोष खबाले-पाटील, प्रशांत खबाले-पाटील, डॉ. प्रमोद खबाले-पाटील, सौ. जयश्री हणमंतराव खबाले-पाटील, जगदंबा महिला  प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संगिता बाळासाहेब खबाले-पाटील, पाटण खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन हणमंतराव खबाले-पाटील, पै. अक्षय खबाले-पाटील,  उद्योजक विक्रम खबाल-पाटील यांनी केले आहे.