चेन्नई एअरपोर्टवरुन 1.34 कोटी जप्त, सर्व नोटा 2000 रुपयांच्या

चेन्नई, दि. 22 - नोटाबंदीनंतर जुन्य आणि नव्या नोटा जप्तीचं सत्र सुरुच आहे. आयकर विभागाची पथकं देशभरात विविध ठिकाणी छापा टाकत आहे. त्यातच आज पहाटे चेन्नई एअरपोर्टवर 1.34 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नोटा 2000 रुपयांच्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून  त्यांच्याकडून 1 कोटी 34 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो  कुठे  घेऊन जात होते, याची चौकशी सुरु आहे.