Breaking News

सनरायझर्सचा सलग तिसरा विजय

हैदराबाद, दि. 24 -  मुस्तफिजूर रहमानच्या धारदार गोलंदाजीनंतर जबरदस्त सूर गवसलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आयपीएल 9 मधील चौथे अर्धशतक या बळावर सनराझजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचा 5 गडी
राखून पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर आणि मोइजेज हेनरिक्स यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला 6 बाद 143 धावसंख्येवर रोखले. त्यानंतर वॉर्नर (59) आणि शिखर धवन (45) यांनी सलामीसाठी केलेल्या 90 धावांच्या भागीदारीच्या बळावर 17.5 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा करीत सलग तिसरा विजय मिळवला.
वॉर्नरने 31 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार, 3 षटकार मारले, तर शिखर धवनने 44 चेंडूंत 4 चौकार मारले. पंजाबकडून शॉन मार्शने सर्वाधिक 40 धावा केल्या. अक्षर पटेलने 17 चेंडूंतच 1 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 36 धावांची खेळी केली. याशिवाय निखिल नाईक (22) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.