केमिकल स्फोटानंतर डोंबवलीकर घरफोड्यांनी त्रस्त

डोंबवर्ली, दि. 29 - शहरातील ’प्रोबेस’ या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर दुर्घटनाग्रस्त ठिकाणी ढिगारा उपसताना रसायनांची गळती होऊन त्रास होऊ नये, यासाठी 500 मीटर परिसरातील लोकांना घरे सोडून तात्पुरते स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनतर नागरीकांनी आपली घरे सोडून दुसर्‍या ठिकाणी पलायन केले. घरातील लोक घर सोडून गेल्याचा डाव साधत चोरट्यांनी तेथिल 20 घरांची तोडफोड करुन आतील ऐवज लुटला आ
हे. त्यामुळे आधी स्फोटामुळे हैरान असलेले नागरीक आता चोरांच्या घरफोड्यामुळे हवालदिक झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी प्रोबेस कंपनीचे मालकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 हून अधिक घरफोड्यांची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे स्फोटात घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणारे चोरटे पाहून असंवेदनशीलतेचं दर्शन घडत आहे. या स्फोटातील मृतांमध्ये कंपनीचे मालक विश्‍वास वाकटकर यांची दोन मुलं आणि सुनेचा समावेश आहे. स्फोटात सुमित वाकटकर, नंदन वाकटकर आणि सुमितची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात कंपनीचे मालक विश्‍वास वाकटकर हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्फोटामध्ये प्रोबेस कंपनी पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, शेजारच्या एकूण 24 कंपन्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूटाचा खड्ड पडला आहे त्यावरुन स्फोटाची भीषणता लक्षात येते. काही कंपन्यांचे मालक व कामगार उपचार घेत आहेत.