शेअर बाजारात आठवड्यात 98 हजार कोटींची भर!
नवी दिर्ल्ली, दि. 29 - शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाल्याचे चित्र दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील प्रमुख 10 कंपन्यांमध्ये 98 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची भर पडली आहे.
मागील आठवड्यात सेन्सेक्समध्ये सुमारे 1000 अंशांची वाढ झाली असून आहे. परिणामी सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या बाजारभांडवलात देखील मोठी वाढ झाली आहे. आघाडीच्या 10 कंपन्यांमध्ये आयटीसी‘च्या बाजारभांडवलात सर्वाधिक वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, सन फार्मा, कोल इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयटीसी, एचडीएफसी आणि ओएनजीसी या सर्वच कंपन्यांच्या भांडवलात वाढीची नोंद झाली आहे. त्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात रु. 98,598 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे शेअर बाजारात एकूण उत्साहाचे वातावरण आहे.