भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक करा
। काँग्रेसने दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
अहमदनगर, दि. 30 - भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक करा, अशी मागणी करत भिंगार काँग्रेसने यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भिंगार शहर काँगेसतर्फे पंडित नेहरू यांची पुण्यतिथी साजरी झाली. भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड आर. आर. पिल्ले यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे यासंदर्भात लक्ष वेधणार असल्याचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी सांगितले. काँगे्रसचे कार्याध्यक्ष शामराव वाघस्कर, कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे यांनी सांगितले. जिल्हा काँग्रसेचे उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, युवक काँगेसचे अध्यक्ष गौरव ढोणे, सेवा दलाच्या अध्यक्षा नलिनी गायकवाड, चंद्रकांत उजागरे आदी यावेळी उपस्थित होते.अॅड नरेंद्र भिंगारदिवे, विवेक येवले, सुनीता बागडे, जमिला शेख, संजय झोडगे, निजाम पठाण, संजय छत्तीसे, रफिक पटेल, शब्बीर आयुब शेख आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. काँग्रेसचे सचिव रिजवान शेख यांनी आभार मानले.
Post Comment