Breaking News

ठाणे महापालिकेचा शेतकर्‍यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

ठाणे, दि. 31, जानेवारी - शहरात सुरु असलेल्या ’’स्वच्छसर्वेक्षण2018’’ या मोहिमेअंतर्गत ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनविभागाच्या वतीने शेतकरी बांधवासाठी ओल्या कचर्‍यापासून तयार केलेल्या ’जैविक खताचा वापर’ ही एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली आहे . दिवा येथे ही कार्यशाळा घेण्यात आली असून शेतकरी बांधवानी या क ार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद दिला.


‘’स्वच्छ सर्वेक्षण 2018’’अंतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम सुरु असून याच धर्तीवर महापालिकेतील घनकचरा विभागाच्यावतीने ओल्याकचर्‍यापासून तयार केलेल्या’जैविक खताचा वापर’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेत शेतकर्‍यांना ओल्याकचर्‍यापासून जैविकखतनिर्मिती कशी केली जाते. तसेच तयार केलेले जैविक खत शेतीसाठी कसे उपयुक्त आहे. आदीची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.


सध्या तयार केलेल्या जैविक खत शेतकर्‍यांना विनामूल्य देण्यात आले असून शेतकरी बांधवानी या जैविक खताचा जास्तीत जास्त वापर करून शेतीचा आणि पिकाचा नैसर्गिक पोत कायम राखावा असेही आवाहन या कार्यशाळेच्या माध्यमातून महापालिकेने शेतकरी बांधवाना केले.
सदर कार्यशाळेस उपमहापौर रमाकांत मढवी,उपआयुक्त मनीषजोशी , दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महादेव जगताप महापालिका अधिकारी आदी तसेच शेतकरी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते .