कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थी भागविताहेत वाचनाची भूक
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेने आयोजित केलेल्या कथानकथन उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उंदड प्रतिसाद मिळाला. कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांनी कथा श्रवण करीत आपल्यातील उत्सुकतेची भूक भागविली. गेल्या ४ नोव्हेंबरपासून सुरु झालेला उपक्रम २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.वाचनातून विचार प्रगल्भ होतात.
शालेय जीवनात असतांना अवांतर वाचनाचा लळा लागल्यास जीवनाच्या प्रवासात त्याचा खूप फायदा होतो. या हेतूने अ.भा.म. बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेने मुलांमध्ये वाचनाविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी तालुक्यातील विविध शाळांमध्ये कथाकथनाचा उपक्रम राबविला. गेल्या तीन वर्षांपासून संस्था कथाकथनाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
कथाकथनाचा हा उपक्रम महिनाभर सुरु राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या उपक्रमात ज्या कथाकथनकारांना व विद्यालयांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी अ.भ.म.बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे (मो. ८९८३७७१२५७ ) यांच्याशी संपर्क संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या वर्षीच्या उपक्रमात डॉ. संजय मालपाणी, प्रा.मुकूंद डांगे, सुभाष कर्डक, लक्ष्मण ढोले, संदीप सातपूते, संतोष भिडे, संजय गोर्डे, चंद्रशेखर कानडे, सुवर्णा मालपाणी, कविता ढोमसे, मंगल वेल्हाळ, सुलभा जोशी, पुष्पा निऱ्हाळी, दीपक वर्पे, अनिल कडलग, प्रा. ओंकार बिहाणी व शांताराम डोंगरे आदी कथाकथनकारांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील कथा सांगितल्या. गेल्या पंधरा दिवसांत विविध शाळांमध्ये झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.