Breaking News

प्रवरानदीचे संगमनेर भाजपने केले जलपूजन


संगमनेर / प्रतिनिधी । यावर्षी निसर्गाने पावसाचे भरभरून दान दिले. संगमनेरकरांची जीवनदायिनी असलेली अमृतवाहिनी प्रवरा नदी जुलै महिन्यापासून सातत्याने गेले १२१ दिवस अखंड प्रवाहित आहे. अनेक वर्षांनी असा सुयोग यावर्षी जुळून आला. परमेश्वराने केलेल्या या प्रभूकृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमनेर भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी {दि. १८} शनिअमावस्येचा पर्वकाळ साधून प्रवरा नदीचे जलपूजन करण्याचे योजण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व संगमनेरकरांना समाजमाध्यमातून देण्यात आले.
भाजप कार्यकर्त्यांसह अनेक संगमनेरकर नागरिकही शनिवारी संध्याकाळी नदीकिनारी मोठ्या संखेने उपस्थित होते. ज्येष्ठ नेते राम जाजू, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे व शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. सरचिटणीस दिनेश सोमाणी यांनी यावेळी प्रवरा नदीचे पौरोणिक व भौगोलिक महत्व विषद केले. युवा कार्यकर्ते अशोक सावरग्या शिंदे व अमोल मच्छिंद्र शिंदे यांनी सपत्नीक नदीचे जलपूजन केले. वेदमंत्रांच्या घोषात पूजन करून नदीस साडी चोळी अर्पण करण्यात आली.

यावेळी भाजप महिला अध्यक्ष ज्योती भोर, नगरसेविका मेघा भगत, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे ,अपर्णा सांगळे, प्रीती सोमाणी, सारिका ओझा, नीता मोहरीकर, संगीता गवळी, सुरेखा खरे, रेणुका पोगुल, आरती ढोरे , मनीषा नेवासकर, मंजुषा फटांगरे, संगीता लांडगे , रुपाली दिद्दी, रीता कासट, लता खुळे, वर्षा भोईर, सोनल रावल , सुरेखा कर्पे, ज्योती गुप्ता , विद्या जुंदरे, भारती शिंदे आदी उपस्थित होत्या.