Breaking News

कर्नाटकच्या लोकायुक्तांवर हल्ला

नवी दिल्ली : कर्नाटकचे लोकायुक्त न्यायमूर्ती विश्‍वनाथ शेट्टी यांच्यावर एका प्रकरणाची सुनावणी करताना हल्ला झाला आहे. लोकायुक्त शेट्टी यांना हल्ल्यानंतर तातडीने मल्ल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने लोकायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्थेमधील गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे.

हल्लेखोराचे नाव तेजस शर्मा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लोकायुक्त शेट्टी यांची प्रकृती धोक्याबाहेर असून हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे ग ृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पत्रकारांना दिली. हल्लेखोर चाकूसह लोकायुक्तांच्या कार्यालयात कसा पोहोचला याबाबत तपास सुरू असून गृहमंत्री हे स्वतः लोकायुक्तांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात जात आहेत.