सेतू कार्यालयाबाहेर दरपत्रक त्वरित लावणार ः पाटील
अहमदनगर, दि. 30 - सेतू कार्यालयात दाखले देतेवेळी पालकांना विद्यार्थ्यांना काही वेळा अतिरिक्त पैसे देवून भुर्दंड सहन करावा लागतो यामध्ये कर्मचार्यांचा दोष नसतो बाहेरील एजंट मनाला येईल तेवढे पैसे घेवून विद्यार्थ्यांची लूट करतात. पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी पालकही वेळ वाचविण्यासाठी जास्त पैसे खर्च करतात पण आता कोणाचीही फसवणूक होवू नये यासाठी 2 दिवसात सेतू कार्यालयाबाहेर दरपत्रक लावण्यात येईल त्या प्रमाणेच पैसे आकारले जाईल. असे आश्वासन तहसीलदार सुधीर पाटील यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार पाटील यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात 10 वी, 12 वी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेत विविध दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात आर्थिक मुर्दंड सोसावा लागतो. पालक-विद्यार्थी नाईलाजास्तव जास्त पैसे देवून कागदपत्रे मिळविण्यासाठी सेतू चालक अव्वाचा सव्वा दर घेतात यामध्ये सर्वाची आर्थिक पिळवणूक होवून मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे होवू नये म्हणून हे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा गांभिर्याने विचार करून श्री पाटील यांनी 2 दिवसात योग्य ते दर निश्चित करून सेतू कार्यालयाबाहेर दरपत्रक लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा शहर सरचिटणीस सागर कराळे, अल्पसंख्याक शहर प्रमुख अज्जुभाई शेख, ऋषीकेश कावरे, मनोज अडसूळ, संतोष उमाप, राजू ढवळे, दादा पेटारे, रोहित कोरके, बंटी जंगम, सुनिल उबाळे, महेंद्र गायकवाड, नितीन बेल्हेकर, गौरव कराळे आदी उपस्थित होते.