छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले. तर रिझर्व्ह पोलीस फोर्स (आरपीएफ)चा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
चिंतागुफा पोलीस ठाण्याचे आरपीएफ दल नियमित गस्त घालत असताना माओवाद्यांनी मीनपा गावाजवळील जंगलात भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. असे सुकमाचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांनी सांगितले. या हल्ल्यात हुक्का आणि उका या दोन माओवाद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडील दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. हुक्का हा त्या भागातील माओवाद्यांचा कमांडर असल्याचे सांगितले जाते. जखमी जवानाला हवाई मार्गाने रायपुरला हलविण्यात आले आहे, असे मीना यांनी सां गितले.

Post Comment