Breaking News

विधानपरिषद निवडणूक : सहाव्या उमेदवारामुळे निवडणूकीत रंगत

नागपूर : येत्या 16 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणार्‍या निवडणूकीसाठी गुरूवारी भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील रंगत वाढली आहे. येत्या 16 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे निवडणूकीची रंगत वाढली आहे. आज भाजपाकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर,रमेश पाटील आणि निलय नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांच्यासह, शेकापचे जयंत पाटील,कॉग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 11 जागांसाठी 12 अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. उद्या 6 जुलैला अर्जांची छाननी करण्यात येईल.9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.