Breaking News

राज्यातील 302 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन दुमजली इमारत

मुंबई : एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील 302 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या ग्रामविक ास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. ग्रामविकास खात्यामार्फत ही योजना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना म्हणून ओळखली जाणार आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रा. पं. ना इमारत बांधून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता आणि स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन पंकजा मुंडे यांनी ही योजना आखली आहे. एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या गावांत ग्रामपंचायत कार्यालयाची स्वतःची स्वतंत्र इमारत नाही अशा राज्यातील 302 ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात इमारत बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली आहे, त्यासाठी प्रत्येकी बारा लाख रुपये इतका निधी मिळणार आहे, यातील नव्वद टक्के रक्क म ग्रामविकास विभाग तर दहा टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने स्वनिधीतून द्यावयाची आहे. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आराखड्यानुसार बांधण्यात येणारी नवीन इमारत दुमजली असून त्याचे क्षेत्रफळ 77.19 चौमी म्हणजेच 839.17 चौरस फूट असणार आहे. यामध्ये जनसुविधा के द्राबरोबरच तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व ग्रामीण स्तरावरील शासकीय कर्मचारी यांना बसण्याची व्यवस्था तसेच मिटींग हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहेत. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची देवाण घेवाण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्या देखील यात असणार आहेत.

या जिल्ह्यातील ग्रामपचांयतीचा समावेश पुणे-25, सातारा- 3,सांगली-4, कोल्हापूर-17,सोलापूर-2,औरंगाबाद-11, नांदेड-18,हिंगोली-7, उस्मानाबाद- 4, जालना-9 ,परभणी -9, बुलढाणा-16, यवतमाळ-12, चंद्रपूर-6, गडचिरोली-3, नागपूर -6, अकोला-7, वाशीम-3, अमरावती-2, गोंदिया -1,लातूर-5, ना शिक-13, धुळे-3, जळगाव-16, नगर-20, सिंधुदुर्ग-1, रायगड-12, रत्नागिरी-2 आणि पालघर एक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय बांधली जाणार आहेत.