शाह आणि नितीशकुमारांची जागा वाटपावर चर्चा
पाटना/वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बिहार दौर्यावर असून, गुरूवारी त्यांनी जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. उभयतांत लोकसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत ’एनडीए’बरोबर ’जेडीयू’ची यूती कायम राहील, अशी घोषणा जेडीयूने नुकतीच केली आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू मिळून निवडणूक लढविणार आहे, असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह 40 च्या 40 जागांवर एनडीएच्याच जागा सुनिश्चित करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी अमित शहा हे नितीशकुमार यांना सीमांचल वरच जास्त लक्ष केंद्रीत करण्यास सुचीत करतील अशी शक्यता आहे. सीमांचल हे अल्पसंख्यांक असल्यामुळे दोन्हीही पक्षांकरता महत्वाचे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर अपयश आले होते, त्या जागा जेडीयूला देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. मोदीलहरमध्येही बिहारच्या 7 जागा अशा होत्या ज्या भाजप जिंकू शकला नव्हता. याच जागा जेडीयूच्या उमेदवारांकडून जिंकून आणण्याची रणनीती भाजप करत आहे. 2014 च्या लोकसभा निवडनुकीत एनडीएने 40 जागांपैकी 31 जागा मिळवल्या होत्या. अन्य 9 जागा दुसऱया दलाने जिंकल्या होत्या, ज्या आता एनडीएचाच भाग आहेत. अशा प्रकारे आता एनडीएच्या 33 जागा कायम आहेत. आता अमित शाहच्या या प्लॅनचा नीतीश कुमार स्वीकार करतात का हे बघणे रंजक असेल. कारण अमित शाहची ही रणनीती नितीश आणि त्यांच्या पक्षासाठी मोठे आव्हान असेल.

Post Comment