Breaking News

अर्थमंत्र्यांचे जीएसटीच्या दरात कपातीचे संकेत

मुंबई - देशातील अप्रत्यक्ष करांबाबत जी गुंतागुंत होती ती जीएसटीमुळे संपली असून गरजेच्या वस्तूंवरील कर कमी झाल्याने नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. सरकार आता जीएसटीच्या कररचनेत बदल करुन त्याचे दर आणखी कमी करु शकते, असे अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटले आहे.जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त जेटली यांनी काल सरकारची भुमिका स्पष्ट केली. गेल्या वर्षी 1 जुलैपासून आम्ही देशातील गुंतागुंतीची करप्रणाली संपुष्टात आणली. त्यावेळी 13 विविध प्रकारचे कर आणि 5 विविध प्रकारच्या करभरण्याची व्यवस्था होती. करांवर कर लागत होता. प्रत्येक राज्याचे करांचे आपले विभिन्न दर होते. त्यानुसार, करभरणा करावा लागत होता. देशाच्या संघ प्रणालीच्या पद्धती लक्षात घेऊन जीएसटीची कररचना तयार करण्यात आली.जीएसटीमुळे देशभरातील सर्व जकात नाके बंद झाले त्यामुळे गुंतागुंत संपली. आम्ही दर न वाढवता उलट कमी केल्यानंतरही महसुलात वाढ झाली आहे असेही ते म्हणाले.