Breaking News

तालुका पत्रकार संघाच्यावतीने गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप



कोतुळ / प्रतिनिधी 
संकल्प प्रतिष्ठाण अहमदनगरच्या सहकार्याने, तसेच सामाजिक कार्यकर्ते नितेश बनसोडे यांच्या पुढाकाराने आणि अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रिनिवास रेणुकादास यांच्या संकल्पनेतुन कोतुळ येथिल शालेय विद्यार्थ्यांना पाचशे दप्तरांचे आणि शालेय साहित्यांचे मोफत वाटप तहसिलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
जि. प. प्राथमिक शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला कोतुळ येथील ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडुन वाहत होता. पत्रकार शिक्षक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते राजकिय नेते यांनी सभागृह खचाखच भरून गेले होते. पालक आणि विद्यार्थी यांनी अकोले तालुका पत्रकार संघाचे आभार मानले. गरजूवंत विद्यार्थी घडविणे त्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पत्रकार संघ भरिव असे योगदान देणार असल्याचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुकादास यांनी सांगितले. तहसिलदार कांबळे यांनी पत्रकार संघ आणि सामाजिक कार्यकर्ते नितेश बनसोडे यांचे अभिनंदन केले. एक चांगला उपक्रम पत्रकार संघाने राबविला असुन, नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असा हा उपक्रम दिशादर्शक ठरणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले. जि.प. सदस्य रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, गोकुळ कानकाटे तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पत्रकार सुनिल गिते यांनी सूत्रसंचालन तर, गायक देवानंद पोखरकर यांनी गणपतीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात केली. पत्रकार नंदकुमार मंडलिक गोरख घोडके, युवराज हंगेकर, गोकुळ कानकाटे, राजेंद्र देशमुख, विनय समुद्र, निरंजन देशमुख, शांताराम साबळे यांसह गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.