Breaking News

दारुबंदीसाठी लोहसरला विशेष ग्रामसभा,महीलांनी घेतला पुढाकार


करंजी /प्रतिनिधी /- अवैधरित्या गावात होणारी दारु विक्री तातडीने बंद करावी. तसेच यापुढे कायमस्वरूपी गावात दारु विक्री बंद करावी. यासाठी लोहसर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभचे आयोजन केले होते. तसा ठराव रविवार,४ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. या ग्रामसभेचे वैशिष्ट म्हणजे महीलांनी पुढाकार घेवुन ही ग्रामसभा आयोजीत केली होती. त्यामुळे या ग्रामसभेला महीलाची मोठया संख्येने उपस्थिती होती . अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण हे होते . सरपंच अनिल गिते , उपसरपंच डॉ. गोरक्ष गिते, सेवा संस्थेचे चेअरमन रावसाहेब वांदेकर आदीची प्रमुख उपस्थिती होती .
ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सरपंच अनिल गिते म्हणाले की, लोहसर गावाने आदर्श गाव योजनेमध्ये दोन वर्षापुर्वी सहभाग घेतलेला असून, गावाची वाटचाल आदर्श अशीच चालु आहे. तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव,पर्यावरण संतुलीत गाव, स्मार्ट ग्राम व्हिलेज आदी पुरस्कार लोहसर गावाने प्राप्त केले आहेत. चाराबंदी, कुऱ्हाड बंदी, व पाणी आडवा पाणी जिरवा या योजना प्रभावीपने राबविल्यामुळे लोहसर हे जलस्वयंपुर्ण गाव झाले असून, गावाची आर्थिक स्थिती सुधारली आहे.

अशावेळी गावाचे आरोग्य सुधारत असताना गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्याला महत्व देण्यात येत असून, लोहसर गावाने व्यसनमुक्तीचा संकल्प सोडला आहे. भैरवनाथ जयंती निमित्ताने अनेक तरूणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनाला हद्दपार केले आहे. परंतु तरीही गावात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे महिलांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे २६ जानेवारी झालेल्या ग्रामसभेत दारूबंदी विषयी विशेष ग्रामसभा बोलायचे ठरवले. त्या दृष्टीने ग्रामसभा महत्वाची असल्याचे सांगुन गिते म्हणाले की महीलांनी पुढाकार घेवुन ही ग्रामसभा आयोजीत केली आहे. गावात यापुढे कोणीही दारू विक्री करु नये, दारु विक्री केल्यास त्यास पोलिसाच्या ताब्यात देवुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला