राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
मुंबई, दि. 21, जुलै - राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील आमदारांची मतं फुटल्याची चर्चा असतानाच, आता युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार फुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 2 विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. धक्कादायक!, असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं.