श्री स्वामी समर्थ पतसंस्थेवर कारवाई अटळ
श्रीगोंदा / प्रतिनिधी
काष्टी येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्था यांनी काष्टीत येथील राजेंद्र पाचपुते यांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी तपास अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, काष्टी येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्था यांच्यावर फसवणुकीचा आरोप करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये आर.के कलेक्शन काष्टी करिता राजेंद्र माणिकराव पाचपुते या कर्जदाराची दि. 24 एप्रिल 2015 रोजी रू. 77,835 एवढ्या रक्कमेची श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी यांच्याकडून फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असल्याचा अहवाल मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांना सादर केला आहे. यावर जिल्हा उपनिबंधक मागील काही महिन्यापूर्वी काष्टी येथील धनश्री पतसंस्थेवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी व सर्व संचालक मंडळ यांच्यावर कारवाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.