Breaking News

तरडगाव येथील चाराडेपोची देयके त्वरीत मिळावी; केसरकर यांचा आत्महत्येचा इशारा


कर्जत / प्रतिनिधी 
कर्जत तालुक्यातील तरडगाव येथील शिवाजी केसकर यांनी जयभवानी सहकारी दुध संस्थेमार्फत पाटेगाव पं.स. गणातील तरडगावसह 13 गावाकरीता 10 जून 2012 ते 14 ऑगष्ट 2012 पर्यंत शासनाच्या आदेशाप्रमाणे चारा डेपो चालविलेला आहे. मात्र, शासनानाकडून अद्यापपर्यंत त्यांना संपुर्ण रक्कम मिळालेली नाही. शासनाच्या नियम अटी व आदेशानुसार आमची रक्कम 10 दिवसात अदा करावी, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा शिवाजी केसकर यांनी शासनास व संबंधीत अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने राज्यात जनावरांच्या छावण्या व चारा डेपोस मान्यता दिलेल्या होत्या. त्याच पध्दतीने कर्जत तालुक्यातही छावण्या व चारा डेपो सुरू करण्यात आले होते. तरडगाव येथील शिवाजी केसकर यांनी शासनाच्या आदेशानुसार चारा डेपो चालवुन जनावरांना जगविण्याचे काम केले. मात्र त्यांनी जनावरांना देण्यासाठी चारा बाहेरून आणून वाटप केलेला आहे.वाटप केलेला चारा हा 6.319 मॅट्रीक टन होता तर, त्याची 2750 शासकीय दराप्रमाणे किंमत 1 कोटी 73 लाख 77 हजार 250 इतकी आहे. शासनाने शिवाजी केसकर यांना 57 लाख 38 हजार 989 रक्कम अदा केली आहे.
या चारा डेपोस दंड झाला असुन, औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार, 35 लाख 30 हजार 912 कपात केलेली आहे. तर, उर्वरीत रक्कम केसकर यांना मिळणे आवश्यक आहे. तसे शासनाने, 14 जून 2014, ला तहसिलदार कर्जत यांना कळविले आहे. या पत्रात संस्थेचे ऑडीट करून, रक्कम तात्काळ देण्यात यावी. परंतु कर्जतचे तहसिलदार हे शासनाला चुकीचे पत्र पाठवुन दिशाभुल करीत आहेत. तरी देखील शासनाने दिलेल्या पत्राने रक्कम अदा करण्याचे कळवुनही तहसीलदार हे जाणीवपुर्वक पिळणवुक करत आहेत. बील देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

तहसीलदार हे शासनानाच्या व जिल्हाधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत असल्याने, माझे खूप मोठया प्रमाणात नुकसानीस कारण ठरत असुन, माझी मानसिक, आर्थिक नुकसान करत आहेत. एवढेच नव्हे तर, कोर्टाचा निकाल लागुनही दखल घेत नाही. त्यामुळे माझ्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला असुन, माझे कुटूंब मानसिक तणावाखाली आहे. तर मला लोकांचे पैसे देणे असल्याने त्याचा तगादा सारखा मागे लागल्याने मला अत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आपण आत्मदहन करणार असल्याचे शिवाजी केसकर यांनी सांगीतले.