अहमदनगर प्रेसफोटोग्राफर असो. सहकार्याने चिंगारी ग्रुप आयोजित आदर्शगाव हिवरेबाजार येथे फोटोवाँक व उत्कृष्ठ फोटो स्पर्धा

नगर- पूर्वीपेक्षा फोटोग्राफी करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून व्यावसायिक पेक्षा हौशी फोटोग्राफरची संख्या वाढत आहे. या सर्वांना त्यांच्यातील कला व्यक्त करण्यासाठी अहमदनगर प्रेसफोटोग्राफर असो सहकार्याने चिंगारी ग्रुपतर्फे अहमदनगर स्थापना दिनाचे औचित्य साधून आदर्शगाव हिवरेबाजार येथे फोटोवाँक व उत्कृष्ठ फोटो स्पर्धा येत्या रविवार दि. २७ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित केली आहे.सोशल मिडिया पार्टनर म्हणून नगर ब्रँण्डिंगचे ज्ञानेश शिंदे यांचे सहकार्य लाभले असून नगर ब्रँण्डिंगच्या फेसबुक पेजवर या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे पाहण्यास उपलब्ध होतील.

भर उन्हाळ्यात आदर्शगाव हिवरेबाजार मधील परिस्थिती, रस्ते ,स्वच्छ:ता,शेती, डोंगर ,शेतीकाम , ट्रेनिंग सेंटर, शाळा इमारत, सुंदर ग्रामपंचायत आदीचे छायाचित्रण ( फोटोग्राफी ) करण्याची सुवर्णसंधी या फोटोवाँक मुळे उपलब्ध होणार आहे.तसेच सहभागी फोटोग्राफरची निवडक दोन छायाचित्र स्पर्धेसाठी स्वीकारली जातील. यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन व उत्कृष्ट छायाचित्रांना पारितोषिके दिली जातील. फोटोवाँक व उत्कृष्ठ फोटो स्पर्धा यासाठी प्रत्येकी २००रु. शुल्क असून नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती साठी संपर्क G2 – 9850780330 / चैतन्य – 9822110788 . नावनोंदणी साठी संजय फोटो ,चितळेरोड ,नगर वाचनालय – 9890906801 व इमेज स्केवेअर,पराग निकेतन, महावीर नगर सावेडी - 9404980133 संपर्क साधावा