काँग्रेस-जेडीएसची आघाडी 'अपवित्र'

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसची आघाडी अत्यंत अपवित्र आहे. कानडी जनतेने काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपला आपला कौल दिला होता. मात्र, उभय पक्षांनी त्यांची फसवणूक करून कर्नाटकची सत्ता हस्तगत केली, अशी तिखट प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी प्रथमच कर्नाटकातील कुरघोडीच्या राजकारणावर भाष्य करताना दिली..