कर्नाटकात राज्यपालांकडून लोकशाहीची थट्टा -रजनीकांत


कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांचा वेळ देणे म्हणजे ही लोकशाहीची निव्वळ थट्टा आहे, अशी जोरदार टीका तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी केली. कर्नाटकातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला असला तरी रजनीकांत यांनी या प्रकरणी भाजपाला धारेवर धरले आहे.  कर्नाटकात शनिवारी जे काही झाले ते लोकशाहीचा विजय होता. 

भाजपाने बहुमत सिद्ध करण्यासाठी काही वेळ मागितला आणि राज्यपालांनी १५ दिवसांचा वेळ दिला. असे करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा होय, अशी टीका अभिनयातून राजकारणात उडी मारणाऱ्या रजनीकांत यांनी केली. यावेळी त्यांनी लोकशाहीचे मूल्य जिवंत ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले. सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपाने बहुमत नसताना राज्यात सत्ता स्थापन करण्याची खेळी केली होती