गांधी जयंतीला रेल्वेत नाही मिळणार मांसाहारी भोजन!


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असून, त्यांच्या जयंतीप्रीत्यर्थ पुढील तीन वर्षे २ ऑक्टोबर रोजी भारतीय रेल्वेमध्ये मांसाहारी भोजन मिळणार नाही. 

या संबंधित एक प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे विचाराधीन आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर गांधी जयंतीचे औचित्य साधून देशात 'शाकाहार दिन' पाळण्याविषयी सरकार विचारमंथन करीत आहे..