लालूप्रसादांची प्रकृती बिघडली, तपासणीसाठी मंगळवारी मुंबईत


चक्कर येणे, रक्तदाब व साखरेत चढ-उतार अशा प्रकृतीसंदर्भातील तक्रारीनंतर शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना उपचारासाठी पाटण्यातील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आयजीआयएमएस) येथे दाखल करण्यात आले. त्यांना मंंगळवारी मुंबईत आणले जाईल.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता व्हील चेअरवर लालूप्रसाद आयजीआयएमएस येथे पोहाेचले. आयजीआयएमएसचे वैद्यकीय अधीक्षक मनीष मंडल यांनी सांगितले, राजद अध्यक्ष लालू सुमारे दीड तास रुग्णालयात होते. या वेळी कॉर्डिअाेलाॅजी, नॅफ्रॉलॉजी, यूरॉलॉजी, आर्थोच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.