Breaking News

समाजकल्याण अधिकार्‍याला दमदाटी करून मारहाण


सोलापूर, दि. 27, नोव्हेंबर - सोलापूर पत्रकारभवन चौकातून कारमधून जाताना समाज कल्याण विभागात काम करणारे अधिकारी अमित घवले ( रा. हांडे प्लॉट, जुना पुणे नाक ा) यांना दोघांनी रिक्षातून येऊन शिवीगाळ करून मारहाण केली. एमएच 13 बीव्ही 0379 या रिक्षातून दोघेजण आले. कारसमोर आडवी लावून मस्ती आली आहे का, म्हणून दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. मौलाली चौकात मुज्जमील मलंग कुरेशी ( रा. कुरेशी गल्ली) याच्यावर तिघांनी मिळून मारहाण करीत ब्लेडने वार केले. महिबूब कुरेशी, जलील कुरेशी, ऐहमत कुरेशी (रा. कुरेशी गल्ली) यांच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांमध्ये लहान मुलांच्या कारणावरू न भांडण झाले होते. मागील राग मनात धरून मुज्जमील याला दोघांनी पकडून ठेवले. 

महिबूब याने छातीवर पाठीवर ब्लेडने वार केला. इंदिरानगरजुळे सोलापूर सिद्धशांती का ॅम्प्लेक्समधील रहिवासी मिलिंद अभ्यंकर यांच्या घरातून तीन मोबाइल चोरीला गेले आहेत. विजापूर नाका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. बंद हॉलचा दरवाजा उचकटून घरात टेबलवर ठेवलेले तीन मोबाइल चोरीस गेले आहेत.