चोरी करीत असल्याच्या संशयावरून एक दलित व्यक्ती कथितरीत्या केलेल्या मारहाणीत मृत्युमुखी
या संदर्भात सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडीओतील घटनेत दोन जणांना दाखवण्यात आले असल्यामुळे या घटनेने वेगळेच वळण घेतले आहे. व्हिडीओतील मुकेश वणिया या कचरा वेचणाऱ्याला काठीने मारहाण केली जात असल्याचे दाखवण्यात आले आहे, तर दुसऱ्या व्यक्तीच्या कंबरेला दोरी बांधली असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओआधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
राजकोट ग्रामीण पोलीस प्रभारी अधीक्षक श्रुती एस. मेहता म्हणाल्या, कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला काही लोकांनी राजकोट जिल्ह्यातील शापार शहराजवळील राडाडिया उद्योगाच्या कंपाऊंडजवळ रविवारी मारहाण केली होती. राडाडिया कंपनीच्या मालकाने या व्यक्तीला आणि त्याची बायको कथित चोरी करीत असल्याचे म्हटले आहे
Post Comment