कालव्याची कामे मार्गी लावा ; आंदोलकांची मागणी


राहुरी वि. प्रतिनिधी  - निळवंडे धरणातून कोपरगाव शिर्डी प्रस्तावित पाईपलाईनला विरोध करणे आणि कालव्याची कामे तातडीने मार्गी लावणे या मागणीसाठी निळवंडे कृती समितीच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.नगरध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी अरूण कडू, दादासाहेब पवार, चंदन मुसमाङे, डाॅ. रविंद्र गागरे, ह. भ. प. संजय महाराज शेटे, ह. भ. प. अशोक महाराज मुसमाङे, नंदकिशोर मुसमाङे, किरण गव्हाणे, विष्णू सिनारे, सुयोग नालकर, जयसिंग घाडगे, दादा नालकर, जगन्नाथ लोंढे, बापू कोबरणे, सतिश सौदागर, विजय नरोडे, कैलास शिंगोटे आदींसह लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रारस्तारोको आंदोलन तब्बल एक तास सुरु होते. नायब तहसीलदार तळेकर आणि पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले यांनी निवेदन स्विकारले.