Breaking News

खरीप हंगामाची बैठक लवकरच : पाटेकर

शेवगाव प्रतिनिधी - तालुक्यातील खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक बुधवारी { दि. ११} पंचायत समितीच्या कार्यालयात आयोजित केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ही बैठक होऊ शकली नाही. मात्र ही बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती शेवगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

ते म्हणाले, की सदर बैठकीसाठी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग तसेच या विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदींना सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत सूचित केले होते. या बैठकीसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे या सकाळी साडेनऊ वाजता शेवगाव शहरात उपस्थित झाल्या. परंतु बैठकीच्या स्थळी कृषी विभागाचे थोडे कर्मचारी सोडले तर कोणतेही, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नव्हते. सकाळी अकरा वाजेपर्यंत वाट पाहूनसुद्धा कोणतेही अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे आ. राजळे यांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याने त्या खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत.