‘प्रवरा’चा १८ ला दीक्षांत सोहळा
प्रवरानगर : येथील प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा १२ वा पदवीदान समारंभ येत्या बुधवारी {दि. १८ } सकाळी साडेदहा वाजता प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न होणार आहे, अशी माहिती उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे दिली. या पदवीदान सोहळ्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे विराधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अध्यक्षस्थानी प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर हे असतील. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १२० विद्यार्थी तसेच तिघांना पी. एच. डी ची पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, रजिस्ट्रार हेमंत पवार आदी उपस्थित होते. या सोहळ्यास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे.