दारूबंदीचे ठराव कचराकुंडीत?


ग्रामदैवतासमोर बाटल्या फोडून ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. गतकाळात अनेक ग्रामसभांनी सादर केलेले दारुबंदीचे अनेक ठराव पोलिस ठाण्यात धूळखात पडून आहेत. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. पोलिस स्टेशन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. पोलिसांनी हे ठराव वरिष्ठांकडे पाठविले, की कचराकुंडीत टाकून दिले, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.