भाजपा नेत्यांनी पाश्चिमात्य कपडे वापरू नयेत - खासदार स्वामी.
नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. कोट-पँट हा पाश्चिमात्य देशांनी थोपवलेला पेहराव आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनी गुलामीचे प्रतीक असलेले हे कपडे घालण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारे कपडे परिधान करावेत, असा सल्ला स्वामींनी दिला आहे.
यामुळे भारतीय संस्कृतीचे जतन होईल. तसेच देशातील अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळेल, असे सांगताना कपड्यांबाबत भाजप नेतृत्वाने एक नियमावली तयार केली पाहिजे, अशी मागणीही केली. सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपा नेत्यांना मद्य प्राशन करू नये, असेही सांगितले आहे. .