पढेगावच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मंजूर
कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात मात्र अवैधधंदे तेजीत आहेत. दरम्यान, पढेगाव येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात दोन तीन दिवस अज्ञात इसमांनी देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या फोडल्या. त्यामुळे गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा चौक गावचा मुख्य रस्ता असून शालेय विद्यार्थी नित्याने ये-जा करत असतात. त्यामुळे सरपंचांनी आज {दि. २०} तातडीची ग्रामसभा बोलावून त्या सभेत गावात दारुबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
सरपंच प्रकाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शाळकरी मुला मुलींसह महिलांना या व्यवसायापासून होत असलेला त्रास यावेळी कथन करण्यात आला. मंदिराच्या परिसरात धार्मिक भावना दुखाविण्याचे कृत्य करणाऱ्या इसमांचे सी.सी.टी. व्ही.फुटेज चेक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या ग्रामसभेत मांडण्यात आला. या ठरावाच्या प्रती पोलिस अधिक्षक, उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक, तहसिलदार यांना देण्यात आल्या.

Post Comment