भगवा फडकविण्यासाठी एकजुटीची गरज : जगताप
शिवसेनेने महिलांना संधी दिली असून सर्व महिला त्यांच्या प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे संघटन बांधणीसह सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नगराध्यक्षपदी असताना शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण करू शिर्डीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही पदाच्या माध्यमातून काम करून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिर्डी विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, असा निर्धार नगर जिल्हा महिला आघाडी प्रमुख व शिर्डी नगरपंचायतीच्या सदस्या अनिता जगताप यांनी केला.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, संपर्क प्रमुख रंजना नेहवालकर आदींसह विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या विविध तालुक्यातील नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल
शिर्डीत नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना उत्तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर कोते, शिवसेनेचे राहाता तालुका अध्यक्ष संजय शिंदे, विजय जगताप आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सुहास वहाडणे होते. जगताप म्हणाल्या, शिवसेनेने जी जबाबदारी आपल्यावर टाकली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडू. नगराध्यक्षपदी असताना शिर्डी शहरातील रस्ते, पाणी, आरोग्यसुविधा मार्गी लावून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. महिलांनी मोठ्या संख्येने राजकारणात येण्याची गरज आहे. महिलांचे संघटन या जोरावर येत्या निवडणुकीत वेगळे चित्र या उत्तर नगर जिल्ह्यात दिसणार आहे. त्यासाठी आतापासूनच महिलांनी तालुक्यात कामास सुरुवात करावी. या महिलांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकद उभी करील.

Post Comment