Breaking News

भारतीय बौद्ध महासभेची ४ ला बैठक


आश्वी प्रतिनिधी ;- संगमनेर येथिल शासकीय विश्रामगृहावर येत्या रविवारी {दि.४} सकाळी अकरा वाजता तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य व समाज बाधंवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष वाय. एल. मुंतोडे यांनी दिली. बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष संजय सपकाळ, संस्कार विभागाचे प्रमुख वाय. डी. लोखंडे, सचिव प्रा. डि. एम. कांबळे, कोषाध्यक्ष तेजस कांबळे, उपाध्यक्ष विशाल कांबळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा कार्यकारणीबाबत चर्चा करुन कार्यकारिणी जाहिर केली जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य व समाज बाधंवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्र गंवादे, साहेबराव टपाल, विजय दारोळे, रावसाहेब पंडीत आदींनी केले आहे.