प्रभाग समितीची आढावा वांझोटी बैठक नक्की कशासाठी?
ब्राम्हणगाव गटाच्या जि. प. सदस्या विमल आगवण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस सभापती अनुसया होन, पंचायत समिती सदस्या वर्षा दाणे, कारभारी आगवण, रोहीदास होन, दिलीप दाणे, भगिरथ शिंदे, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेब शिंदे, सरपंच प्रकाश शिंदे, सरला चांदर, उत्तमराव चरमळ आदींसह बोटावर मोजण्याइतके सरपंच आणि पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, आरोग्य उपकेंद्रांत उपचारच होत नसुन केवळ ती मलमपट्टी करण्यासाठी असल्याची कबुली पदाधिऱ्यांनी या बैठकीत दिली. यातून मार्ग काढणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रभाग बैठका म्हणजे ‘गेटटुगेदर’ असल्याचे स्पस्ष्ट होत आहे/
यावेळी उत्तमराव चरमळ यांनी सरपंच अनुपस्थितीबाबद खेद व्यक्त करत कोणासाठी आढावा बैठक चालली, असा सवाल केला. त्यावर जि. प. सदस्या आगवण यांच्यावतीने कारभारी आगवण यांनी सांगितले, ‘काहींची ग्रामविकासाबद्दल उदासिनता असून नवनिर्वाचित सरपंचांना माहीत नसल्याने उपस्थिती नाही’ यावेळी सभापती होन, विस्तार अधिकारी माळी आदींसह ग्रामसेवक विभागावार अधिकाऱ्यांनी गटातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. प्रारंभी सुरेश नागले यांनी प्रास्तविक केले. दिगंबर बनकर यांनी सूत्रसंचालन केले. योगेश देशमुख यांनी आभार मानले.