जयहिंद आश्रमशाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी - डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोळवाडे गावातील जयहिंद आदिवासी आश्रमशाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी काशिनाथ गोंधे होते. डॉ. भागवत डोईफोडे, श्रीमती कोल्हे, भाऊसाहेब नवले, तात्याबा कुदळ, जयश्री कुदळ, दशरथ वर्पे, संजय अंत्रे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रांतधिकारी डोईफोडे, काशिनाथ गोंधे, श्रीमती कोल्हे आदींनी १० वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, या वर्षीचा आदर्श विद्यार्थी व विद्यार्थीनी पुरस्कार अभिषेक ढवळे आणि वृषाली लहांगे यांनी मिळविला. सूत्रसंचालन विलास भालेराव व पोपट थोरात यांनी केले. संजय अंत्रे यांनी आभार मानले.