नगरपालिकेकडून विकासकामांत दुजाभाव : भालेराव
ते म्हणाले, मोरगे वस्ती याठिकाणी चारी आहे. पंरतु या चारीमध्ये प्रचंड घाण साचली आहे. या भागातील कचरा रस्तावर पडलेला आहे. खराब रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून निकोप राजकारण करावे. या भागातील मंजूर रस्ते तात्काळ दुरूस्त करावेत. अन्यथा भागातील नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरतील.