गुंगीचे औषध देऊन साडे चार लाखांवर डल्ला
जळगाव, दि. 21, जानेवारी - जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा उपद्रव सुरुच आहे. आज, पहाटे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेसह तीन दुक ानांमध्ये घरफोडी करीत चोरट्यांनी तीन लाख 12 हजारांचा ऐवज लंपास केला. तर दुस-या घटनेत पाचोरा येथे महिलेला गुंगीचे औषध देऊन साडेचार लाखांचे दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना घडली.
भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेसह तीन दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यात सुमारे तीन लाख 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास के ला. सकाळी पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक सचिन खांमगड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी व्यवस्थापक युवराज अस्वार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. दुस-या घटनेत काल दुपारी पाचोरा शहरातील प्रकाश टॉकीजचे मालक मनिषा काबरा यांच्याकडे चोरी झाली. दागिने पॉलिश करून देतो असे सांगत अज्ञात चोरट्याने साडे चार लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले. वंदना शरदचंद्र काबरा (वय-67) यांच्या अंगावरील 2 पाटल्या, 4 तोळे सोने, एक लाख 30 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख 5 हजाराची डायमंड सोन्याची अंगठी असा साडेचार लाखांचा ऐवज गायब केला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात घटनेच्या नोंदीचे काम सुरु होते.

Post Comment