डहाणूतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत

पालघर, दि. 21, जानेवारी - डहाणूजवळच्या समुद्र किनार्‍यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तीनही मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


डहाणूजवळच्या समुद्र किनार्‍यावरील दुर्घटनेत मसोली ता. डहाणू .जि. पालघर येथील सोनल भगवन सुरती, जान्हवी हरीश सुरती आणि संस्कृती सूर्या माह्यावंशी या तीन विद्या र्थिनी मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर करण्यात आली आहे.